"आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीची प्रशासकीय हत्या " - प्रमोद क्षिरसागर
निगडी - परभणी येथील संविधान शिल्पाच्या विटंबना प्रकरणी देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसी कारवाईत कैदेत असणाऱ्या आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर सोमवारी आंबेडकर पक्ष संघटनानांकडून महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. त्यानुषंघाने निगडी येथे बंद पुकारून सदर घटनेच्या विरोधात निदर्शने करून निषेध सभा घेण्यात आली.
निषेध सभेत बोलताना वंचितचे प्रमोद क्षिरसागर म्हणाले की " परभणी याठिकाणी संविधान शिल्पाची केलेली विटंबना हा सुनियोजित कट होता. पोलिसांनी संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीचा शोध घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र अन्यायकारक कोम्बिंग करून अटक करण्यात आलेल्या आंदोलकांनाच बेदम मारहाण केली, त्यातच सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीचा दुर्दैवी मृत्यू ही प्रशासकीय हत्या आहे. "
लढा युथ मूव्हमेंट चे बुध्दभुषण अहिरे म्हणाले की, " परभणीत घडविण्यात आलेली घटना ही दुर्दैवी आणि संताप आणणारी आहे. संविधान आणि लोकशाही मानणारा समाज असे कृत्य खपवून घेणार नाही. जो पर्यंत आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दोषींवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आंबेकरी समाज स्वस्थ बसणार नाही"
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबन हिवाळे, समाधान कांबळे, संभाजी गाजरे, ह्यूमन राईटचे जावेद शिकलगार, रशीद सिद्धीकी, रशीद आत्तार, अल्ताफ शेख, हाजीमलंग आत्तार,मौलाना अजहर, मोसीन शमीम, शहणाज शेख, तथागत बुद्ध विहाराचे दिलीप धबडगे, नालंदा ग्रुपचे गौतम पटेकर, सचिन नायकुडे, प्रफुल्ल क्षिरसागर,राजरत्न बुद्ध विहारचे रमेश गायकवाड, कार्यसम्राट प्रतिष्ठानचे मंथन गायकवाड, अक्षय सोनकांबळे, सागर बहुले, धम्मक्रांतीचे धम्मप्रकाश क्षिरसागर, सिद्धार्थ मोरे, पंकज धेंडे, अतिश नागटिळक, संदीप माने, तक्षशिला ग्रुपचे विशाल मांजरे , सागर सूर्यवंशी, क्रांती भीमज्योत ग्रुपचे राजकुमार रणधीर,गौतम सरदार, सिद्धार्थ ओव्हाळ, अभिनय पोटभरे, प्रविण पंडित, स्वप्नील प्रधान, फुलचंद मनेरे, अमोल बाविस्कर, विश्वरत्न बुद्ध विहारचे रणजित डोंगरे, व्यापारी संघटनेचे अमरजीत सिंह,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.