Breaking

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

दोहा, कतार येथे होणाऱ्या पहिल्या आशियाई सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंची निवड

 दोहा, कतार येथे होणाऱ्या पहिल्या आशियाई सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंची निवड

दोहा, कतार येथे २७, २८ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या पहिल्या आशियाई सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडमधील सूरज बांगर, श्रेया दंडे, रिद्धीका पाटील आणि केतन नवले या खेळाडूंची निवड झाली आहे. गेल्या वर्षभरापासून हे खेळाडू स्पर्धेसाठी कठोर सराव करत असून त्यांची मेहनत फळाला येत आहे.


मागील मे महिन्यात या खेळाडूंनी मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि पदकांची कमाई करून देशाचे नाव उज्ज्वल केले होते. आता पुन्हा त्याच जोमाने आणि आत्मविश्वासाने ते आशियाई स्पर्धेत सहभागी होणार आहेत.


या खेळाडूंना प्रशिक्षक संजय बनसोडे तसेच सहकारी किरण अडागळे, स्मिता धिवार, अभय नवले, रविराज चाखाले आणि अजय नवले यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले. प्रशिक्षकांच्या मेहनतीमुळे आणि खेळाडूंच्या प्रचंड जिद्दीमुळे या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.


संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील क्रीडाप्रेमींना या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आता प्रतीक्षा आहे.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox