वाकड व निगडी येथील कारवाईमध्ये
९ किलो गांजा जप्त; महिलेसह ३ आरोपी ताब्यात
शहरामध्ये वेगवेगळ्या दोन कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे नऊ किलो गांजा जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी- चिंचवड शहरात गांजा विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची करडी नजर आहे. याच अनुषंगाने कारवाई करत पोलिसांनी नऊ किलो गांजा जप्त केला आहे. सूरज पंडित पवार, हफिजअली मेहबुबअली सव्यद आणि मोहिनी आनंद जाधव या तिघांना अटक केली आहे.
पिंपरी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील काळाखडक येथे अंमली पदार्थ विरोधी पथक हे गस्त घालत होत. पथकातील पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड . यांना माहिती मिळाली की दोन संशयित सुरज पंडित पवार आणि हफिजअली मेहबूबअली यांच्याकडे गांजा आहे. त्यांना ताब्यात घेऊन सुरज च्या घरी तीन किलो ७२२ ग्रॅम गांजा पोलिसांना आढळला. दोन मोबाईल देखील मिळाले दुसऱ्या कारवाई मध्ये निगडीत दत्त मंदिराच्या परिसरात शौचालयाच्या आडोशाला संशयितरित्या मोहिनी जाधव ही महिला थांबली होती. मोहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मोहिनीच्या घरी देखील चार किलो गांजा पोलिसांना मिळाला. दोन्ही कारवाई मध्ये सुमारे नऊ किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे.
ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या व
सचिन कदम, विक्रम गायकवाड, पो. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, जिलानी मोमीन, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, गोविंद डोके, प्रसाद कलाटे, गणेश करपे, राजेंद्र वाबळे, जावेद बागसिराज, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, विजय दौंडकर, अजित कुटे, रणधीर माने व चिंतामण सुपे यांच्या पथकाने केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.