Breaking

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

सोमनाथ सूर्यवंशी: कोठडीत मृत्यूमुळे खळबळ, जाणून घ्या सविस्तर माहिती

 सोमनाथ सूर्यवंशी: कोठडीत मृत्यूमुळे खळबळ, जाणून घ्या सविस्तर माहिती


परभणीत संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केल्याचा दावा झाल्यानंतर मोठा हिंसाचार उफाळला होता. याच प्रकरणातील हिंसाचारामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात "शरीरावरील अनेक मारामुळे झालेल्या धक्क्याने मृत्यू" झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका आणि परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.


शवविच्छेदन अहवालात नेमके काय?

छत्रपती संभाजीनगरातील सरकारी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशी यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रक्रियेचे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात आले. प्राथमिक दाव्यांनुसार हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शवविच्छेदनात "Shock following multiple injuries" म्हणजेच शरीरावरील अनेक जखमांमुळे धक्क्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.


परीक्षेसाठी परभणी शहरात दाखल

सोमनाथ सूर्यवंशी हे मूळचे पुण्याचे रहिवासी होते. ते परभणीतील महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत होते. सध्या त्यांच्या परीक्षेसाठी ते परभणीत आले होते. ते एलएलबीच्या तिसऱ्या वर्गात शिकत होते. आधार कार्डवरील माहितीनुसार त्यांचा जन्म 23 जुलै 1989 रोजी झाला होता, तर ते पुण्यातील भोसरी भागात राहत होते.


सामाजिक संताप व प्रतिक्रिया

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर समाजात मोठा आक्रोश व्यक्त होत आहे. अनेक संघटना आणि विरोधी पक्षांनी सरकारवर व पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात न्यायासाठी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. प्रकाश आंबेडकर स्वत: परभणीत दाखल झाले असून त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


घटनाक्रमावर राज्यभराचे लक्ष

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस कोठडीत झाल्याने ही घटना अत्यंत गंभीर बनली आहे. सरकारवर आणि पोलिस प्रशासनावर होणारी टीका वाढली असून, सत्य समोर आणण्यासाठी चौकशीची मागणी होत आहे. या प्रकरणामुळे राज्यभरातील सामाजिक आणि राजकीय वातावरण 

ढवळून निघाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox