Breaking

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

सिंहगड रोड पोलिसांकडून अवैध्यरित्या व्यावसायीक गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या इसमांवर छापा कारवाई, १०लाख २८हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.

 सिंहगड रोड पोलिसांकडून अवैध्यरित्या व्यावसायीक गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या इसमांवर छापा कारवाई, १०लाख २८हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.

सिंहगड रोड पोलिसांना बातमी मिळाली की एक व्यक्ती हा व्यवसायिक गॅस सिलेंडर याचा काळाबाजार करत आहे बातमी मिळताच पोलिसांनी वडगाव भाजी मंडई, गोयल गंगाकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला सिंहगड रोड पुणे येथे एक व्यक्ती हा अनाधिकृतपणे स्वतःच्या फायद्या करीता व्यवसायीक गॅस सिलेडंरची अवैद्यरित्या विक्री करीत असताना मिळून आला, त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता ,सोमनाथ लहु भोजने वय- ३१ वर्षे रा. रिध्दी-सिध्दी बिल्डींग पार्कीग रुममध्ये, सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे असे असल्याचे सांगितले नमुद इसमाकडे एच पी गॅस व भारत गॅस कंपनीच्या एकुण ७२ टाक्या व एक महिंद्र कंपनीचा पिकअप टेम्पो असा एकुण १०लाख २८हजार ४०० -रु. किं.चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,


अधिक माहिती 

दि.११/१२/२०२४ रोजी पो.उप निरी संतोष भांडवलकर व तपास पथकातील स्टाफ तपास पथक कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना त्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वडगाव भाजी मंडई, गोयल गंगाकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला सिंहगड रोड पुणे येथे एक इसम हा अनाधिकृतपणे व्यवसायीक गॅस सिलेडंरची अवैद्यरित्या विक्री करीत आहे.

अशी बातमी मिळाल्याने बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता वडगाव भाजी मंडई, सिंहगडरोड क्षेत्रीय कार्यालय, गोयल गंगाकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला सार्वजनिक रस्त्यावर सिंहगड रोड पुणे येथे एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो उभा असलेला दिसला, सदर टेम्पो मधुन एक इसम निळ्या पिवळ्या रंगाच्या गॅसच्या टाक्यांचा अवैधरित्या साठा करुन विक्री करताना दिसुन आला त्यावेळी आमची व पंचाची खात्री झाल्याने वरील स्टाफच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम मिळुन आलेने त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याचे नाव १) सोमनाथ लहु भोजने वय- ३१ वर्षे रा. रिध्दी-सिध्दी बिल्डींग पार्कीग रुममध्ये, सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे असे असल्याचे सांगितले नमुद इसमाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, सदरच्या भरलेल्या टाक्या ह्या त्याचा मालक याने विक्री करण्यासाठी दिल्या होत्या असे सांगितलेने मिळुन आलेल्या टाक्यांची पंचाची समक्ष पाहणी केली असता एच पी गॅस व भारत गॅस कंपनीच्या एकुण ७२ टाक्या व एक महिंद्र कंपनीचा पिकअप टेम्पो असा एकुण १०,२८,४००/-रु. किं.चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं ७३१/२०२४ बी.एन.एस. कलम भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २८७,२८८,३ (५) सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ अन्वये दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत.


सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परी. ३ श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग, श्री अजय परमार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दिलीप दाईगंडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, श्री संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारु, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास बांदल, यांचे पथकाने केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox