Breaking

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

संविधान प्रतिकृती विटंबनेचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे तीव्र निषेध

 संविधान प्रतिकृती विटंबनेचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे तीव्र निषेध

परभणी: जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यानजीक असलेल्या संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीची माथेफिरू व्यक्तीने विटंबना केल्याची घटना घडली आहे. या कृत्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.


पीपल्स रिपब्लिकन पार्टी पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष प्रा. इजि. करण रामदास ताटे यांनी या घटनेबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे. "सदर माथेफिरूचे हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. यामुळे समाजात अशांतता पसरू शकते. पोलिसांनी संबंधित माथेफिरूला तात्काळ अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी त्यांनी केली आहे.


या घटनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या जनसमुदायामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ही केवळ एका प्रतिकृतीवरील हल्ला नसून भारतीय संविधान व समाजाच्या मूलभूत तत्त्वांवर प्रहार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.


या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून समाजातील सर्व घटकांनी शांतता राखून कायद्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox