Breaking

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ...!

 


महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ...



LPG Cylinder | आज १ ऑगस्टरोजी महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्व सामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्या (Government Oil Companies) आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत मोठे बदल केले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.


आज १ ऑगस्टपासून १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर महाग झाला आहेत. घरगुती वापरासाठी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे हा दिलासा मिळाला आहे.


आजपासून दरवाढ

आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये जवळपास ८ ते ९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ केवळ १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल झाला नाही.


आजपासून मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडर ८०२.५० रुपयांना मिळणार आहे. तर १९ किलोच्या निळ्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६०५ रुपये झाली आहे. त्यात ७ रुपयांनी वाढ झाली आहे. पुर्वी (LPG Cylinder ) हे दर १५९८ रुपये होते. देशभरात ही वाढ आजपासून करण्यात आली आहे.


बजेटनंतर महागले गॅस सिलेंडर

दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत ६.५० रुपयांनी वाढून १६५२.५० रुपये झाली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात किंमत १९ रुपयांनी कमी होऊन १,६४६ रुपयांवर आली होती. तर, कोलकातामध्ये आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १,७६४.५० रुपयांना उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत सलग चार महिने कमी केली जात होती. आज १ तारखेला मात्र, त्यात वाढ करण्यात आली. मोदी सरकारने पहिल्या अर्थसंकल्पानंतर सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरच्या किमती वाढवून मोठा धक्का दिला आहे.


दुसरीकडे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीतील (LPG Cylinder ) शेवटचा बदल मार्चमध्ये झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त (८ मार्च २०२४) एलपीजी सिलेंडरच्या किमतींत १०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. सध्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox