Breaking

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

दहावी पास तरुणांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी; होमगार्ड पदांसाठी भरती सुरू..

 


दहावी पास तरुणांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी; होमगार्ड पदांसाठी भरती सुरू


होम गार्ड भरती २०२४ | दहावी पास असणाऱ्या युवकांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. राज्यात सध्या जिल्हानिहाय होमगार्ड भरती सुरू झाली आहे. तरुणांसाठी ही नोकरीची मोठी संधी असणार आहे. त्यामुळे वेळेचा व्यत्यय न करता लगेच अर्ज भरण्यास सुरुवात (होम गार्ड भरती २०२४ )करावी.


पोलीस विभागाच्या सहकार्याने राज्यात होमगार्डसाठी नोंदणी सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ही १४ ते १६ ऑगस्टपर्यंत आहे. जिल्हानिहाय अर्ज भरण्याची शेवटची तारीख वेगळी आहे.


या भरतीमध्ये होमगार्ड म्हणून नियुक्त झाल्यानंतर प्रतिदिन ८९५ रुपये भत्ता राज्यसरकारकडून दिला जातो.होमगार्ड ही नोकरी किंवा रोजगार नसून आपत्कालिन स्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या मागणीनुसार त्यांना बंदोबस्तासाठी बोलवले जाते. म्हणजेच अग्निशमन, विमोचन, महामारीकाळात, संपकाळात प्रशासनाच्या मदतीसाठी होमगार्डची नियुक्ती केली जाते.


भरतीसाठी पात्रता काय?

शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

इच्छुक उमेदवाराचे वय साधारण २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षांच्या आत असावे.

उंची- पुरुषांकरता १६२ सेमी महिलांकरता १५० सेमी

छाती- (फक्त पुरुष उमेदवारांकरता)- न फुगविता किमान ७६ सेमी (होम गार्ड भरती २०२४ )


कागदपत्रे कोणती लागणार?

रहीवासी पुरावा

शैक्षणिक आहर्ता प्रमाणपत्र

जन्मदिनांक पुराव्यासाठी १० वी बोर्ड प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचा दाखला

तांत्रिक अहर्ता धारण करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र

खासगी नोकरी करत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र

3 महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र (होम गार्ड भरती २०२४ )


प्रतिदिन भत्ता किती मिळणार?

नियूक्ती झालेल्या उमेदवाराला बंदोबस्त दरम्यान नियुक्त केल्यास प्रतिदिन ८९५ रुपये भत्ता देण्यात येतो. यामध्ये बंदोबस्त काळात 570 रुपये कर्तव्य भत्ता, १०० रुपये उपहार भत्ता तर प्रशिक्षणकाळात ३५ रु खिसाभत्ता व १०० रुपये भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी ९० रुपये मिळतात. (होम गार्ड भरती २०२४ )


अर्ज कुठे करणार?

इच्छुक उमेदवार https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर जाऊन सर्व माहिती प्राप्त करू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox