निगडी येथे सराईत रिक्षा चोरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या, चार चोरीच्या रिक्षा हस्तगत; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
निगडी येथे सराईत रिक्षा चोराला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्या सराईताकडून चार चोरीच्या रिक्षा देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. गणेश दत्तु सुर्यवंशी (वय ३० वर्षे रा. ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने ही कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार (दि.०४) रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस नाईक देवा राऊत यांना मिळाली कि, एक इसम चोरीची ऑटो रिक्षा घेवून ओटास्किम निगडी भागात फिरत आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार करुन तात्काळ ओटास्किम भागात पाठविले. भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणी चौक रोडवर शोध घेत असतांना TVS कंपनीची ओटो रिक्षा नंबर MH 14 CU 0481 ही सुसाट चालवित संशयित इसम चालवित असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. त्याचवेळी त्या व्यक्तीला पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो भरधाव वेगाने रिक्षा चालवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना सापळा लावुन पोलीस पथकाने आरोपी गणेश दत्तु सुर्यवंशी (वय ३० वर्षे रा. ओटास्किम, निगडी) याला अत्यंत शिताफीने रिक्षासह ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने ती ऑटो रिक्षा MH 14 CU 0481 ही रुपीनगर परिसरातून चोरल्याची कबुली दिली. आरोपी गणेश दत्तु सुर्यवंशी हा सराईत चोरटा असल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरातुन व कोथरुड येथुन एकूण ०४ प्रवाशी वाहतुकीच्या ओटो रिक्षा बनावट चावीचा वापर करुन चोरल्याची कबुली दिली.
हस्तगत करण्यात आलेल्या रिक्षा..
1) MH 14 CU 0481- TVS कंपनीची ओटो रिक्षा तिचा इंजिन नंबर OK4GC1085790 व
चेसीस नंबर MD6M14CKIC4G15717
2) MH 14 HM 3017 – TVS कंपनीची ऑटो रिक्षा तिचा इंजिन क्रमांक AK-4EK4202194 व
चेसीस नंबर MD6M14CA3K4E00118
3) MH 12 NW 5363 BAJAJ कंपनीची ऑटो रिक्षा तिचा इंजिन नंबर AZYWHH2211922119 व चेसीस नंबर MD2A27AY8HWH71307
4) MH 14 JS0535 TVS कंपनीची ऑटो रिक्षा तिचा इंजिन नंबर OK4ND1040532 व
चेसीस नंबर MD6M14CK5D4N12055
अश्या प्रकारे होत होती रिक्षाची चोरी आणि विक्री....
आरोपी गणेश दत्तु सुर्यवंशी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द यापुर्वी चोरीचे गुन्हे नोंद आहेत. आरोपीत हा हॅन्डल लॉक नसलेल्या, निर्जनस्थळी पार्कीग केलेल्या प्रवाशी वाहतूकीच्या रिक्षा बनावट चावीचा वापर करुन चोरी करीत होता. चोरीच्या रिक्षा अशिक्षीत लोकांना विक्री करुन पैसे कमविण्याचे प्रयत्नात असतांना त्याला गुन्हे शाखेकडून पकडण्यात आले आहे. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी, हॅन्डल लॉक करुन पार्कीग करावीत व संशयित इसमांबाबत तात्काळ नियंत्रण कक्षाला माहीती कळवावी असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, देवा राऊत, नामदेव कापसे, अजित सानप यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.