मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यास जाणवतात 'ही' लक्षणे; तुम्हालाही असल्यास आजच डॉक्टरांची भेट घ्या....
अनेक व्यक्तींना वयाच्या तिशीमध्येच डोकं दुखणे, अंग दुखणे, थकवा, नसांमध्ये दुखणे अशा समस्या जाणवत असतात. सतत अशक्तपणा आणि काम होत नसल्याने आपल्याला म्हातारे झाल्यासारखे वाटते. मात्र या म्हातारपणाच्या कळा नसून अन्य काही असू शकते.
अनेक व्यक्तींना मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यावर देखील ही लक्षणे जाणवतात.
मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यास त्या व्यक्तीला डोळ्यांवर अंधाऱ्या येणे, अशक्तपणा, कमी दिसणे, गोष्टी सतत विसरणे, कितीही आठवण्याचा प्रयत्न केला तरी गोष्टी न आठवणे या समस्या जाणवतात. त्यामुळे तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत असल्यास यातून बाहेर पडण्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
मेंदूमध्ये रक्त साठणे
मेंदूमध्ये रक्त साठणे म्हणजेच मेंदूमध्ये नसांमध्ये रक्ताच्या गाठी होणे. यामुळे संपूर्ण मेंदूला आणि नसांना रक्तपुरवठा होत नाही. यामुळे हा त्रास असलेल्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज सुद्धा होण्याची भीती असते. त्यामुळे स्वत:चा जीव प्रिय असेल तर या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे
ब्रेन स्ट्रोक होणार असल्यास आधी डोक्यावरील संतुलन बिघडते. यामध्ये तोंडातून अन्न पाणी गिळता येत नाही. जेवण थेट खाली पडते. सतत डोक्यात चक्कर जाणवते आणि प्रचंड अशक्तपणा वाटतो.
या ठिकाणी सुद्धा ब्लॉकेज होतात
फक्त मेंदूमध्ये नाही तर रक्ताच्या अशा जीवघेण्या गाठी पायात, फुप्फुसांमध्ये आणि नसांमध्ये सुद्धा होतात. त्यामुळेच व्यक्तींना हार्ट अटॅक येतो.
उपाय
रक्ताच्या या गाठी दूर व्हाव्यात यासाठी रक्त पातळ करावं लागतं. त्यासाठी हळद, अद्रक, लाल मिरची, या ३ गोष्टी दातांनी बारीक चावून खाव्यात. याचे सेवन केल्याने रक्त पातळ होते. रक्तात तयार झालेल्या गाठी कमी होतात आणि आपल्यावर ओढावणारं संकट कमी होतं.
Note: It is important to consult a doctor before taking any remedy after reading all the above articles.Before taking any remedy, consult a doctor
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.