Breaking

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

लाडक्या बहिणींसाठी आणखी एक चांगली बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा....

 


लाडक्या बहिणींसाठी आणखी एक चांगली बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा....


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक गूड न्यूज दिली आहे.


ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत, त्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत मंजूर होतील आणि त्यांना दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये जुलैपासून 3 महिन्यांचे पैसे मिळतील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे आता 17 ऑगस्टला रक्षाबंधणापूर्वी देण्यात येणाऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे आले नाहीत, तरी ते पुढील टप्प्यात मिळणार आहेत. 


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 


जळगाव येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक गूड न्यूज दिली आहे. ज्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत, त्यांचे अर्ज देखील 31 ऑगस्ट पर्यंत मंजूर होतील आणि त्यांच्या खात्यातही जुलैपासूनचे सर्व पैसे सप्टेंबरमध्ये जमा होतील असे फडणवीस यांना सांगितले. तसेच ज्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत प्राप्त होतील अशा सर्व लाडक्या बहिणांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे मिळून 4500 रुपये एकत्र मिळतील. ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील, अशा खात्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलतान दिली. 


बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेतील आतापर्यंत 1 कोटी 35 लाख अर्ज मंजूर झाले आहेत. रक्षाबंधणाच्या मुहूर्तावर 17 ऑगस्ट या सर्व महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. परंतु हे लक्षात घ्या की ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही, अशा महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या सर्व लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


जुलैपासूनचे सर्व पैसे मिळणार


आतापर्यंत मंजूर झालेल्या अर्जांपैकी 35 लाख अर्ज असे आहेत ज्यात महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही, या सर्व महिलांनी आपले खाते आधारशी लिंक करावे असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. त्यांना या पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाही तर काळजी करू नका, बँक खाते आधार लिंक केल्यानंतर सप्टेंबरमध्ये पुढील टप्प्यात जुलैपासूनचे सर्व पैसे मिळतील असे देखील फडणवीस यांनी सांगितले आहे. ज्यांचे बँक खाते आधारलिंक नाहीत त्यांना बँकेत जाऊन खाते आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे.


मोबाईल ॲप बंद, आता पोर्टलववर भरता येणार अर्ज


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरवातीला 'नारीशक्ती दूत'वर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावर सव्वादोन ते अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. आता ते ॲप बंद करण्यात आले असून नवीन अर्ज करण्यसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन अर्ज करणाऱ्यांनी या पोर्टवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox