Breaking

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

चार दिवसापासून बेपत्ता असलेला इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी "अर्पित सूर्यकांत दुबे" याचा दुर्दैवी मृत्यू पालकांचा ज्ञानदीप शाळेवरती संशय

 


चार दिवसापासून बेपत्ता असलेला इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी "अर्पित सूर्यकांत दुबे" याचा दुर्दैवी मृत्यू पालकांचा ज्ञानदीप शाळेवरती संशय 

ज्ञानदीप माध्यमिक आणि सौ अनुसया वाढोकर उच्च माध्यमिक विद्यालय

 , गणेश नगर, तळवडे, या शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गाला शिकत असलेला "अर्पित सूर्यकांत दुबे" पत्ता :- PCMC कॉलनी, निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, इमारत क्रमांक :-8, होमवर्क केला नाही म्हणून अर्पित ला शिक्षकांनी मारलं व शाळेच्या बाहेर पाठवले. शिक्षकांनी आम्हाला उशिरा फोन करून कळवले.शाळेच्या फी साठी पाच पाच मिनिटाला फोन करणाऱ्या शिक्षकांनी आत्ता फोन का नाही केला? शाळा चालू असताना विद्यार्थ्याला शाळेच्या गेटच्या बाहेर पाठवलेच कसे? असे पालकांचे म्हणणे आहे. अर्पितच्या नातेवाईकांनी अर्पित मिसिंग झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. निगडी पोलीस ठाणे-४१११०४४ एफआयआर क्र.०४३४, दिनांक-२७/०७/२०२४


आमच्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूला शाळाच जबाबदार आहे. आम्हाला न्याय मिळावा व शाळे वरती कठोर कारवाई व्हावी "दिव्य महाराष्ट्र 24 न्यूज" शी

बोलताना अर्पितच्या पालकांनी आपली तळमळ व्यक्त केली आहे. 

अधिक तपास पोलीस करत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox