Breaking

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

पिंपरी-चिंचवड शहरात झिकाचा शिरकाव, आढळले दोन रुग्ण वैद्यकीय विभागाकडून सर्वेक्षण सुरु झिकाचा शिरकाव

 


पिंपरी-चिंचवड शहरात झिकाचा शिरकाव, आढळले दोन रुग्ण वैद्यकीय विभागाकडून सर्वेक्षण सुरु झिकाचा शिरकाव

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात झिकाचा शिरकाव झाला असून झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने महापालिका वैद्यकीय यंत्रणेची पळापळ सरु झाली आहे. एक रुग्ण निगडीतील आणि दुसरा पिंपळे गुरव येथील रहिवासी असून त्यांच्यावर दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही रुग्णांच्या राहत्या घरापासून पाच चौरस किलोमीटर परिसरात महापालिकेकडून सर्वेक्षण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.


पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्युचा प्रादुर्भाव फोफावत आहे. सध्या शहरात ३९ डेंग्युचे


रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डेंग्युला आळा घालण्यासाठी महापालिकेने ४ हजार ६७६ संशयित रुग्णांची रक्त तपासणी केली. त्यामध्ये ३९ जणांचा डेंग्यु आजाराची लक्षणे आढळून आली. तर, दोन जणांना झिका झाल्याचे समोर आले. या दोन्ही रुग्णांवर दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दोन्ही रुग्ण कामासाठी पुण्यात जात असल्याने पुण्यात त्यांना झिका विषाणुचे संक्रमण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकावर पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालय आणि एकावर पुण्यातील एम्स रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox