Breaking

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

'वीजबिल भरू नका, वायरमन आला तर माझं नाव सांगा' - अजित पवार.

 


'वीजबिल भरू नका, वायरमन आला तर माझं नाव सांगा' - अजित पवार

दिंडोरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा आजपासून सुरु झालेली आहे. दरम्यान आयोजित सभेत बोलताना अजित पवारांनी शेतकऱ्यांना थकीत असलेले वीजबिल भरू नका, कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला सांगा अजितदादाने सांगितलंय, असे फर्मान सोडले आहे.


शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागचं वीजबिल देखील माफ केलं आणि पुढची वीज मोफत येणार आहे. त्यामुळं कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर वीजबिल भरू नका, त्याला माझं नाव सांगा, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे.


अजित पवार म्हणाले, माझ्यासाठी जनता हीच देव आहे आणि तुमचं पाठबळ हीच खरी शक्ती आहे. आम्ही महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या. जनतेची सेवा करणं हाच आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाहीत तर आम्ही जनसेवक आहोत. राज्यात महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावाला काहीच मिळालं नाही, अशी ओरड सुरू केली. मात्र, आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना सुरू केली आहे.


ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यापुढे कृषी वीज बिल भरावे लागणार नाही.

एवढेच नाही तर आतापर्यंत थकबाकीची बिले भरण्याची गरज नाही.

राज्य सरकारच्या सौरपंप योजनमुळे यापुढं शेतकऱ्याना वीजेसाठी अवलंबून राहावे लागणार नाही.

सौरऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता शेतकऱ्यांना सौरपंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देता येईल,

याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.




दुधामध्ये भेसळ करणाऱ्यावर मोक्का लावणार👇🏻 अजित पवार.....








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox