महापालिका आयुक्तांच्या गाडीची फोडली काच, दिव्यांग व्यक्तीचा संताप...
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून दिव्यांग व्यक्तींना त्रास दिला जातो. मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत असा आरोप करत एका दिव्यांग व्यक्तीने आयुक्त शेखर सिंह यांच्या मोटारीची काच फोडली. अजय गायकवाड असे काच फोडणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनी हा प्रकार घडला आहे. महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण सुरु होते. आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत सुरू होते. त्याचवेळी अजय गायकवाड यांनी काठीच्या सहाय्याने आयुक्त सिंह यांच्या मोटारीची काच फोडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता.
महापालिकेमध्ये सामान्यांसाठी लोकशाही संपलेली आहे. सध्या फक्त हुकूमशाही सुरु आहे. या अधिकाऱ्यांना लोकशाहीची जाणीव करून देण्यासाठी ही कृती केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.