माणुसकी म्हणजे केवळ शब्द नाही, तर ती एक कृती आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात माणुसकीचे उदाहरण कसे घालू शकतो?... वाचा सविस्तर बातमी
माणुसकी म्हणजेच मानवतेचा गुणधर्म, जो आपल्याला एकमेकांशी जोडतो. माणुसकी ही एक अशी भावना आहे जी आपल्याला दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची, त्यांना मदत करण्याची आणि त्यांच्या सुखात आनंद मानण्याची प्रेरणा देते.
माणुसकीचे महत्व अनेक कथा, लेख आणि अनुभवांमधून आपल्याला शिकायला मिळते.
असाच एक प्रसंग..."तानाजी(आण्णा)बळवंत काळभोर" यांच्या कृतीतून दिसून येत आहे...... वाचा सविस्तर बातमी👇🏻
"निगडी येथील भक्ती शक्ती शिल्प समोर आमचे हाॅटेल स्वप्न उपहार गृह मध्ये रात्री ११ वाजता, सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूर जवळील आष्टी, नागाव गावातील एक शेतकरी कुटूंबातील श्री राजेंद्र यशवंत शिसाळे नावाचे ग्रस्त हे आपली पुतणी कु.अश्विनी यशवंत शिसाळे हिला घेऊन हाॅटेलात आले
या वेळी मी स्वतः ( तानाजी काळभोर ) या ठिकाणी होतो. या वेळी शिसाळे दादांनी मला सांगितले कि
उद्या दिनांक.११/८/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता सोमाटणे फाटा येथील टोल नाक्या शेजारील हाय व्हिजन काॅलेज मध्ये माझी पुतणी कु.अश्विनी चा जुनियर आकाऊटंट चा पेपर आहे परंतु या परिसरात आम्ही पहिल्यांदा आलो आहोत.उद्या सकाळी ७ वाजता या काॅलेज मध्ये आम्हाला पोचावे लागेल. तसेच अश्विनीताई च्या दोन पेपरची प्निंन्ट ही काढावी लागणार आहे. तरच तिला उद्या परीक्षेला बसता येईल असे मला दयावया करून या चुलत्या पुतणीने सांगितले
या नंतर मी प्रथम त्यांना जेवन व चहा दिला.व कुढलीही वेळ न घालवता निगडी ट्रान्सपोर्ट नगरीतील माझे मित्र श्री शर्मा शेठ यांना रात्री १२ वाजता फोन केला व सर्व परिस्थिती सांगितली.व या मुलीचा उद्या पेपर आहे असे सांगून तिला पेपरच्या दोन प्निंन्ट काढून देयाच्या आहेत. या साठी आपल्या ऑफीस मधून दोन प्निंन्ट काढता येईल का असे विचारले त्या वेळी श्री शर्मा शेठ म्हणाले काळभोर शेठ मी माझा लॅपटॉप घेऊन माझ्या ऑफीस मध्ये येतो तुम्हीही शिसाळे काकांना व त्या मुलीला घेऊन माझ्या ऑफीस मध्ये या आपण लगेच त्या मुलीला पेपरची प्निंन्ट काढून देऊ असे सांगितल्या नंतर मी स्वतः ( तानाजी काळभोर) व माझा मुलगा चि.आकाश व माझ्या साडूचा मुलगा श्री अक्षय बहिरट आम्ही सर्व जण शर्मा शेठ यांच्या ऑफीस मध्ये गेलो व रात्री १२:३० वाजता पेपर प्निंन्ट काढून घेतल्या.
या नंतर रात्री १ वाजल्या मुळे त्यांना सोमाटणे फाटा येथे जाण्यासाठी कुठले वाहन नव्हते या मुळे मी त्यांना सांगितले कि आता तुम्ही कोठेच जाऊ नका माझ्या घरीच राहा असे सांगून त्यांना झोपण्यासाठी एक रूम दिला.व आज दि.१०/८/२०२४ सकाळी ६ वाजता त्यांना उठविले त्यानंतर ते फ्रेश झाले. नंतर त्यांना चहा दिला व मी स्वतः ( तानाजी काळभोर ) त्यांना सकाळी भक्ती शक्ती बसस्टॉप मधून सोमाटणे फाटा बस मध्ये त्यांना बसून दिले.व पेपर सोडविण्यासाठी अश्विनीताई ला शुभेच्छा दिल्या.या वेळी अश्विनीताई ला गहिवरून आले.
यानंतर सोमाटणे फाटा येथे काॅलेज मध्ये पेपर चालू होण्यापूर्वी ते वेळेत त्या ठिकाणी पोचले.
या नंतर मला त्यांनी फोन केला व आम्हा सर्वाचे खूप खूप आभार मानले.
तसेच पेपर संपल्या नंतर दुपारी ११ वाजता पुन्हा फोन केला व मला सांगितले कि आम्ही भेगडेवाडी रेल्वे स्टेशन येथून पुणे रेल्वे स्टेशन ला जातो व तेथून आम्ही स्वारगेट येथून एसटी ने सांगलीला जातो असे फोन करून मला ( तानाजी काळभोर) सांगितले.
तसेच ते सांगलीला रात्री ८ वाजता त्यांच्या घरी पोहोचले असे त्यांनी मला पुन्हा फोन करून सांगितले व पुन्हा त्यांनी आमच्या सर्वाचे आभार व्यक्त करून सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.
मला ऐवढेच सांगायाचे कि अशी वेळ आपल्यावर सुध्दा येऊ शकते म्हणून शक्य होईल तेवढे आपण चांगले सत्कर्म केलेच पाहिजे असे मला अभिमानाने सांगावे वाटते."
"तानाजी(आण्णा)बळवंत काळभोर
अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान निगडीगाव
उपाध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिंपरी-चिंचवड शहर
उपाध्यक्ष EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती पिंपरी-चिंचवड शहर"
माणुसकी म्हणजे केवळ शब्द नाही, तर ती एक कृती आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात माणुसकीचे उदाहरण कसे घालू शकतो? आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून आपण माणुसकीचे दर्शन घडवू शकतो.
निगडी सेक्टर 22 मध्ये अज्ञात गाव गुंडांकडून सुमारे 20 ते 25 गाड्यांची फोड तोड👇🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.