Breaking

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४

कोरोनानंतर आता नवं संकट, 'या' विषाणूनं उडवली झोप, पुण्याला विळखा ...

 



पुणे शहरात झिकाचा धोका वाढला आहे, शहरात आतापर्यंत एकूण ६६ जणांना झिकाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे झिकाच्या रुग्णांमध्ये २६ गर्भवती महिलांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.


पुण्यांमध्ये दिवसेंदिवस झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण ६६ जणांना झिकाचा संसर्ग झाला आहे. ज्यामध्ये २६ गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली आहे. संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहान करण्यात आलं आहे.


काय आहे झिकाची लक्षणं?


झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं. झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल १९७४ मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. त्यानंतर १९५२ साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला.१९५० पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. २००७ ते २०१६ या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला, २०१५-१६ मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं. अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox