M S E B ला प्रभाग क्रमांक 12 समस्या निवारण समितीच्या वतीने जोरदार दणका
रुपीनगरच्या नागरिकांना रोजच्या रोज जाणाऱ्या लाईट संदर्भात होणाऱ्या नाहक त्रासाबद्दल नागरिकांना गेरसोय होऊ नये यासाठी केलेला एक छोटासा प्रमाणिक प्रयत्न
आणि प्रयत्नाला आले यश
काल निगडी प्राधिकरण ऑफिस तसेच मेन डिव्हिजन भोसरी येथे व भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या ऑफिसला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटून नागरिकांच्या समस्या मांडून पत्र व्यवहार करून नागरिकांच्या वतीने काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत आणि त्या मान्य ही झाल्या आहेत
लवकरच रुपीनगर तळवडे ऑफिसला पंधरा दिवसाच्या आत नवीन अधिकारी ची नेमणूक होईल
नागरिकांचे फोन उचलण्या ची सूचना सर्व कर्मचाऱ्यांना केली
सर्व एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी साठी रात्री अप रात्री काम करीत असताना काठी, बॅटरी, हॅन्ड ग्लोज , सेफ्टी शूज चांगल्या प्रकारची शिडी गाडी ची व्यवस्था उत्तम प्रकारची असावी अशी सूचना करण्यात आली आहे
नागरिकांच्या तक्रारी शांततेत व्यवस्थित ऐकून घेऊन योग्य प्रकारे निवारण करण्याच्या सूचना करण्यात आली आहे
नवीन सब स्टेशनची मागणी , नवीन मोठ्या लोड च्या डीपी ची मागणी तसेच जुन्या झालेल्या डीपी बॉक्स बदलून हवे आहेत याची मागणी करण्यात आली आहे.
आणि नागरिकांच्या घराची वायर जर ब्रेक झाली तर ती एमएसईबीने बदलून द्यावी नाहक खर्च नागरिकांवर नको अशी सूचना करण्यात आली
अतिशय महत्त्वाचे
सततच्या वीज खंडित होण्यामुळे लाईट जाण्यामुळे
वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांना आपला जॉब गमवावा लागला आहे
हॉस्पिटल ,मेडिकल दवाखाने , व्यापारी, उद्योजक, यांनाही विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे .
विद्यार्थी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे
सर्वात जास्त महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे
नागरिकांची लाईट गेल्याने अतोनात हाल होत आहे
या सर्व मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जनसेवक संदीप जाधव
सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा ताई देशमुख त्याचबरोबर नाभिक संघाचे अध्यक्ष: दत्ताभाऊ खरे , ह्यूमन राईट चे संतोष जी शेटे, संतोष नाईक सर ज्येष्ठ नागरिक सुरेश तुपे, सुनील भाऊ वाघमारे बाळकृष्ण शारंगधर, समर्थ काका, गायकवाड काका त्याचबरोबर तरुण कार्यकर्ते सागर इंगळे
अशे अनेक नागरिक उपस्थित होते
सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नाला 99% यश आले आहे
लवकरच सर्व कामे योग्य पद्धतीने सुरळीत सुरू होतील असे आश्वासन एमएसईबी च्या वतीने देण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.