Breaking

बुधवार, ३१ जुलै, २०२४

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट...

 



यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवा ट्विस्



राज्याला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे हत्याकांडात महत्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून ताब्यात घेण्यात आले. याआधी मयत तरुणीच्या संपर्कात असलेल्या मोहसिन नावाच्या युवकाला ताब्यात घेण्यात आले. मुंबईतील उरण या भागात यशश्रीची एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. यशश्रीच्या संपर्कात असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी मोहसिनला (पूर्ण नाव माहिती नाही) ताब्यात घेतले. मोहसिन फोनवर सातत्याने यशश्रीच्या संपर्कात असल्याचे पोलिसांकडे पुरावे असल्याची माहिती मिळत आहे. कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानंतर या हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊदला अटक करण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox