Breaking

मंगळवार, २३ जुलै, २०२४

“मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना काढा”, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

 


“मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना काढा”, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल




लक्ष्मण हाके | मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्यांचा आंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या हेतूने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आहे. यावरून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना टोला लगावला. सरकारने मनोज जरांगेंना लाडका आंदोलक नावाची योजना जाहीर करावी असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी (लक्ष्मण हाके) टीका केली.


लाडका आंदोलक योजना जाहीर करावी

आजपासून जनआक्रेश यात्रेला सुरूवात झाली. आंदोलक लक्ष्मण हाकेंनी (लक्ष्मण हाके) शासनाच्या खरापती वाटल्यासारखे कुणबी सर्टिफिकेट वाटलं जात असल्याचा आरोप केला गेला आहे. शासनाने लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली तशी लाडका आंदोलक योजना जरांगेंसाठी जाहीर करावी. आपल्या शासनकर्ते मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे. तुम्ही आमचं आरक्षण टिकवणार आहात का?, असा सवाल त्यांनी केला.


दरम्यान लक्ष्मण हाकेंचे (लक्ष्मण हाके) साथीदार नवनाथ वाघमारे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. प्रशासन आणि सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम हे मनोज जरांगे पाटील करताना दिसत आहे. जरांगे नावाच्या बांडगुळाने राज्यात हौदास केला असल्याचा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.


जरांगेंच्या आंदोलनामागे कोणाचा हात आहे हे सर्व महाराष्ट्राला माहिती झालं. मनोज जरांगेंच्या मागे खुद्द मुख्यमंत्री असल्याचं सांगत आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.


“ओबीसी-मराठा वादात शरद पवार”

यावेळी बोलत असताना लक्ष्मण हाके (लक्ष्मण हाके) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ओबीसी-मराठा वादात शरद पवार आहेत. ते मूग गिळून गप्प आहेत. तसेच उद्धव ठाकरे देखील काहीही बोलत नसल्याचं हाके म्हणाले आहेत.


मनोज जरांगेंचं आंदोलन हे बेकायदेशीर आहे. त्यांचं आंदोलन हे पॉलिटिक्स स्क्रिप्टनुसार सुरू असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला आहे. महामानवांच्या पुतळ्याखाली बसून मनोज जरांगे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox