दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात करोनाने धुमाकुळ घातला होता. करोनामुळं जगभरात हाहाकार माजला होता. कित्येक जणांना प्राण गमवावे लागले होते. आता कुठे संपूर्ण जग हळूहळू स्थिरस्थावर होतं.
लोकांच्या मनातून करोनाचे भय निघून गेले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा करोनाने डोकं वर काढलं आहे. जपानमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागानेही इशारा देत म्हटलं आहे की, जपानमध्ये एक नवीन आणि अत्याधिक धोकादायक असा करोनाव्हायरसचा व्हेरियंटचा प्रसार झाला आहे. ज्यामुळं देशात कोविडची लाट पसरू शकते, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
जपान संक्रमित रोग संस्थेचे अध्य काजुहिरो टेटेडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानमध्ये KP.3 व्हेरियंटचा फैलाव होत आहे. इतंकच नव्हे तर ज्या लोकांनी करोनाची लस घेतली आहे किंवा आधी झालल्या संक्रमणातूनही ते ठीक झाले आहेत. त्यांनाही करोनाच्या या नव्या व्हेरियंटची लागण होत आहे. टेटेडा यांनी दिस विक इन एशियाला दिलेल्या माहितीनुसार, दुर्देवाने व्हायरल प्रत्येकवेळी रुप बदलत असून तो अधिक हानिकारक आहे. लसीकरणानंतर लोकांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे.त्यामुळं या व्हायरसवर मात करण्यासाठी रुग्णांच्या शरीरात पुरेशी प्रतिरकारशक्ती नसते.
रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली
महामारीच्या सुरुवातीच्या काळात जपानमध्ये स्थापित करण्यात आलेल्या समितीने म्हटलं आहे की,पुढील काही आठवडे महत्त्वपूर्ण असणार आहेत. कारण अधिकारी व्हेरियंटचा प्रसार आणि प्रभाव किती असेल यावर लक्ष ठेवणार आहेत. तर एकीकडे रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. टेटेडा यांनी म्हटलं आहे की, एक गोष्ट दिलासादायक आहे ती म्हणजे यातील रुग्णांना गंभीर लक्षणे नाहीयेत.KP.3 व्हेरियंटच्या विशिष्ट लक्षणांमध्ये ताप, गळ्यात खवखव, चव व गंध न येणे, डोकेदुखी, थकवा, यासारखी लक्षणे समोर आली आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जपानमध्ये प्राथमिक सेवा देण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत 1 ते 7 जुलै पर्यंत संक्रमणात 1.39 टक्के व 39 टक्क्यांपर्यंतची वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ओकिनावा प्रांतात व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळं सर्वाधिक रुग्णांना संसर्ग झाला आहे. येथे रुग्णालयात दररोज जवळपास संक्रमणांचे 30 रुग्ण समोर येत आहेत. फूजी न्यूज नेटवर्कच्या रिपोर्टनुसार, KP.3 व्हेरियंटने देशभरात कोविड 19च्या 90 टक्कांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आले आहेत. त्यामुळं रुग्णालयात बेडची कमतरता भासू लागली आहेत. त्यामुळं चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.