Breaking

रविवार, २१ जुलै, २०२४

शहराची औद्योगिक क्रांती करण्यात टाटा मोटर्स, बजाज ऑटोची महत्वाची भूमिका शरद पवार

 



टाटा मोटर्सचा प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहरात आणला. त्यानंतर (पिंपरी ) शेकडो छोटे-मोठे कारखाने उभे राहिले. बजाज ऑटोही शहरात आला. या भागात ओद्योगिकक्रांती करण्यात टाटा मोटर्स, बजाज कुटुंबियांची महत्वाची भूमिका बजाविल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले.




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विजयी संकल्प मेळावा पिंपरीगावात  (शनिवारी) पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार रोहित पवार, माजी खासदार श्रीनिवास पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, माजी महापौर आझमभाई पानसरे, ज्येष्ठ नेते अजित गव्हाणे, शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक संजय वाबळे, विनायक रणसुभे, माजी नगरसेविका सुमन पवळे उपस्थित होते. शरद पवार यांना भक्कम साथ देणा-या ८५ जुन्या सहकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.


शरद पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड मध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक्स औषध निर्मिती करण्याऱ्या कंपनीला खूप मोठा इतिहास आहे. महात्मा गांधी हे अहमदाबादमध्ये होते. तेव्हा कस्तुरबा गांधी आजारी पडल्या. पण त्या आजाराचे औषध भारतात नव्हते. त्या आजारपणातच कस्तुरबा गांधी मरण पावल्या. त्यानंतर महात्मा गांधी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी हे औषध उपलब्ध झाले पाहिजे असे म्हटले. त्यानंतर पिंपरीमध्ये पेन्सिलिनचा हा कारखाना सुरू झाला. त्यानंतर पिंपरी- चिंचवड औद्योगिकनगरी झाली. हजारो लोकांना काम मिळाले. कारखानदारी, ऑटो मोबाईल वाढले. अनेकांना रोजगार मिळाला, नवीन पिढीसाठी हिंजवडीला माहिती व तंत्रज्ञान नगरी आणली. चाकणसह विविध भागात एमआयडीसीचा विस्तार केला.


जयंत पाटील म्हणाले, की बेरोजगारी, महागाई वाढली आहे. पेपर फुटत आहेत. उद्योग बाहेर जात आहेत. राज्यात गुंतवणूक येत नाही. भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. त्यामुळे राज्य सरकार बदलणे गरजेचे आहे. सरकारवर आरोप झाला की आता त्याला उत्तर दिले जात नाही. तुरुंगापेक्षा भाजप बरा असा भ्रष्टाचारांचा नारा आहे. भ्रष्टाचार करणा-यांचीच गर्दी भाजपमध्ये आहे. मांडीला मांडी लावून बसलेल्यांवर आरोप आहे. आरोप केलेल्या २५ जणांपैकी २३ जणांची चौकशी बंद झाली. ज्यांच्यावर आरोप केला जातो. त्यांनाच सत्तेत घेतले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात डांबराचा मोठा घोटाळा झाला आहे. औंध संस्थानच्या देवस्थानच्या जमिनी काहींनी लुटुन खाल्ल्या आहेत. त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. १३७ किलोमीटरच्या १६ हजार ६१८ कोटी रुपयांच्या वर्तुळाकार मार्गाचे काम २२ हजार ६१८ कोटी रुपयांना सहा कोटींनी काम वाढवून दिले आहे. भाजपला निवडणूक रोखे देणा-या कंत्राटदारांना कामे देण्यात आली आहे, आता मागे वळून बघायचे नाही. याच दिशेने काम करायचे असा सल्ला अजित गव्हाणे यांना दिला.


सुप्रिया सुळे म्हणाल्या, पक्ष, चिन्ह सगळेच घेऊन गेले होते. शून्यातून सर्व निर्माण केले. संघटनेच्या ताकदीवर पक्षाचे ८ खासदार निवडून गेले. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला आम्ही अगोदर बसलो होतो. त्यानंतर पालकमंत्री तिथे बैठकीला आहे. पालकमंत्री आल्यानंतर पवार साहेब उठून उभा राहिले. त्यांनी प्रोटोकॉल पाळला. शासनाच्या नियमाप्रमाणे खासदार, आमदार निमंत्रित सदस्य म्हणून येतात. त्यांना निधी मागायचा, प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही असे बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी सांगितले. आम्ही बैठकीत बोलायचे की नाही, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. पवार साहेबांनी निधीचा प्रश्न विचारला आणि आम्हाला शासन निर्णय दाखविला. आम्हाला लोकांनीही निवडणून दिले आहे. आम्हाला मत मांडण्याचा आणि प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. सरकार लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. संविधान बदलणार हे भाजपचेच खासदार म्हणाले आहेत. त्यामुळे कोणतेही नॅरेटिव्ह खोटे नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी हे सरकार आहे. महाराष्ट्रात जास्तीत-जास्त आमदार महाविकास आघाडीचे निवडणून आणून सरकार आणायचे आहे.


आमदार रोहित पवार म्हणाले, शहराचा विकास शरद पवार यांच्यामुळे झाला. माहिती व तंत्रज्ञान कंपन्या त्यांनी आणल्या. पाच लाख लोक काम करतात. एमआयडीसीत १२ हजार कंपन्या असून २० लाख लोक काम करत आहेत. शहराच्या विकासासाठी शरद पवार यांनी २४०० कोटी रुपयांचा निधी दिला. कोणतीही अडचण आल्यास त्यांनी पुढाकार घेतला. २०१४ नंतर शहरात केवळ भ्रष्टाचार घडला आहे. टीडीआर, रस्ते सफाई टेंडर, जॅकवेल, वायसीएम, श्वानांची नसबंदीत भ्रष्टाचार झाला आहे. शहराची विभागणी केली आहे. मलिदा गैंगच निविदा घेते. करदात्यांचा पैसा नेत्यांच्या घरात गेला आहे. रोहित पवार म्हणाले, शहराचा विकास शरद पवार यांच्यामुळे झाला.


माहिती व तंत्रज्ञान कंपन्या त्यांनी आणल्या. पाच लाख लोक काम करतात, एमआयडीसीत १२ हजार कंपन्या असून २० लाख लोक काम करत आहेत. शहराच्या विकासासाठी शरद पवार यांनी २४०० कोटी रुपयांचा निधी दिला. कोणतीही अडचण आल्यास त्यांनी पुढाकार घेतला. २०१४ नंतर शहरात केवळ भ्रष्टाचार घडला आहे. टीडीआर, रस्ते सफाई टेंडर, जॅकवेल, वायसीएम, श्वानांची नसबंदीत भ्रष्टाचार झाला आहे. शहराची विभागणी केली आहे. मलिदा गैंगच निविदा घेते. करदात्यांचा पैसा नेत्यांच्या घरात गेला आहे. शरद पवारांचा ८५ वाढदिवस असून ८५ आमदार निवडून आले पाहिजेत. पिंपरी-चिंचवड, भोसरी तिन्ही विधानसभा मतदारसंघाला मिळावेत. काही लोक वाढप्याप्रमाणे स्वतः विकासाचे श्रेय घेतात. मी पणा ही भाजपची स्टाईल आहे. महापालिकेत ८५ नगरसेवक आले पाहिजेत. राज्य सरकारचा ५० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. रुग्णवाहिकेत सहा कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. आदिवासी, समाजकल्याण विभागतही भ्रष्टाचार केला आहे. सरकारच्या योजना गाजर असून भ्रष्टाराकडील लक्ष विचलित करण्यासाठी आणल्या आहेत, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. आमचा आवाज दाबू नका, कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, त्रास दिल्यास पोलीस अधिका-यांना सोडणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox