Dm24News : -पिंपरी-चिंचवड शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतःच्या राहत्या बंगल्याची स्वच्छता करत या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही आपले आरोग्य ही आपलीच जबाबदारी समजून राहत्या घरांची साफसफाई केली असून नागरिकांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी "बीट डेंग्यू" सूत्राचा अवलंब करावा, असे आवाहन
PCMC- आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
शहराला डेंग्यू मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त पिंपरी-चिंचवड शहर ही मोहीम राबविण्यात येत असून त्यानुसार नागरिकांनी आठवड्यात एका दिवसातील एक तास आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपल्या राहत्या घरी स्वच्छता करायची आहे. या डेंग्यूमुक्त मोहिमेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत घरातील कुलर, फ्रीज, पाणी साठवणुकीची भांडी, झाडांच्या कुंड्या, घराच्या परस बागेची स्वच्छता केली.
डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर म्हणजेच बीट डेंग्यू या मोहीमेत जागरूकता वाढवण्यासाठी आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. तसेच डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि डेंग्यूला रोखणं हे महापालिकेचे उद्दिष्ट असून नागरी समुदायाच्या सहभाग वाढविण्यावर आणि आंतरविभागीय समन्वय राखण्यासाठी ही मोहिम उपयुक्त ठरणार आहे, नागरिकांचा सहभाग यामध्ये महत्वाचा असून डेंग्यूला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी जागरूक असणे गरजेचे आहे, असे PCMC- आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
नागरिकांचे आरोग्य सुद्ध कसे ठेवता येईल यासाठी महापालिका सर्व प्रयत्न करत आहे. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बीट डेंग्यू' या संकल्पनेचा अवलंब करावा आणि आपले घर व परिसर स्वच्छ व कोरडे ठेवावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.